शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उमटली कृष्णेंद्राची स्वरनक्षी

By admin | Updated: November 14, 2015 22:21 IST

पिंपळपार : ‘संस्कृती नाशिक’च्या सुरेल मैफलीला दर्दींची हजेरी

नाशिक : दिवाळी पाडव्याला नेहरू चौकातील पिंपळपार सलग १६व्या वर्षी एका अभिजात शास्त्रीय संगीत मैफलीचा साक्षीदार होण्यास सज्ज झाला आणि ख्याल गायकीतून हुबळीच्या कृष्णेंद्राच्या अलवार स्वरांची नक्षी जाळीदार पिंपळपानावर उमटली. ‘संस्कृती नाशिक’ या संस्थेच्या या मैफलीला दर्दी नाशिककरांची प्रतिवर्षीप्रमाणे भरभरून उपस्थिती लाभली.कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांच्या ‘संस्कृती नाशिक’ या संस्थेच्या वतीने यंदा कर्नाटकातील किराणा घराण्याचे गायक व पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य कृष्णेंद्र वाडीकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या मैफलीची सुरुवात कृष्णेंद्र यांनी राग भटियारने केली. एकतालात विलंबित ख्याल आणि तीनतालात छोटा ख्याल सादर करत कृष्णेंद्र यांची मैफल पुढे सरकली. सोबतच झपतालात जौनपुरी राग सादर केला. ‘जागो जागो प्यारे मोरे लाल’, ‘गानविद्या बडी कठीण, गुरुचरणी शिष्यधारी’, ‘पायल बाजन लागी रे’ या रचना सादर करत कृष्णेंद्र यांनी मैफलीत रंग भरले. त्यानंतर त्यांनी ‘पिया मिलन की आस’ ही ठुमरी सादर केली. ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्या’ या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली तर झपतालात ‘दत्तगुरु दत्तगुरु सुमीरण’ हा अभंग सादर करत पाडव्याचा आनंद द्विगुणीत केला. शेवटी ‘देह जाओ अथवा राहो’ आणि ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवनी’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना साथसंगत नाशिकचे नितीन वारे (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), अमित भालेराव (तालवाद्य), रोहित गावडे व विनोद कुलकर्णी (तानपुरा) यांनी केली. सदर मैफल स्व. भास्करराव भातंबरेकर यांना समर्पित करण्यात आली. प्रारंभी, वेदमंत्रोच्चारात महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, ‘लोकमत’चे दिल्ली येथील राजकीय संपादक सुरेश भटेवरा, जयंत भातंबरेकर, विवेक पाटणकर, अ‍ॅड. अशोक जाधव, राजेंद्र राजोळे, पुंडलिक वारे, नाट्यपरिषदेचे नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. (प्रतिनिधी)