शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी जवानास पावणेदोन लाखांस गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:45 IST

आॅनलाइन वाहन खरेदी करणे एका लष्करी जवानास चांगलेच महागात पडले असून, त्यास भामट्याने तब्बल पावणेदोन लाखास गंडविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : आॅनलाइन वाहन खरेदी करणे एका लष्करी जवानास चांगलेच महागात पडले असून, त्यास भामट्याने तब्बल पावणेदोन लाखास गंडविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळाली आर्टिलरी सेंटर येथील एका जवानाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जिह्यातील रहिवासी असलेल्या या जवानास कार खरेदी करावयाची असल्याने ते सोशल मीडिया आणि वाहन खरेदी-विक्रीच्या अ‍ॅपवर वाहनाचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी ‘कारदेखो’ या मोबाइल अ‍ॅपवरील पुणे पासिंग (एमएच १२ एमआर ८०२५) ही वॅगनर कार त्यांना पसंत पडली. छायाचित्राच्या आधारे त्यांनी अ‍ॅपवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता भामट्यांनी जवानाची माहिती मिळवित आपणही पुणे येथे लष्करात असल्याची बतावणी केली. त्यामुळे नाशिकच्या जवानाने त्याच्यावर विश्वास ठेवला. दोघांमध्ये वाहनाचा व्यवहार होऊन १ लाख ७१ हजार ९९८ रुपयांची रक्कम संशयिताने पेटीएम खात्यात आॅनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितली. त्यानुसार मंगळवारी (दि.१२) जवानाने रक्कम अदा केली. मात्र गेले तीन दिवस संशयिताने जवानास वाहन न सोपविल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.टेम्पोच्या धडकेत महिला ठारभरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रमिकनगर येथील चंद्रमणीकुमार दिनेश प्रसाद हे पत्नी रजनीकांत (२६) हिच्यासोबत दुचाकीवर (एमएच ४१ एजे ६५२१) जात असताना हा अपघात झाला होता. गायत्री स्विटसमोर अशोकनगरकडून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले होते. त्यातील रजनीकांत या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.सिडकोत महिलेस दोन लाखांस गंडाकटलरी माल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एकाने दुकानदार महिलेस दोन लाखांस गंडा घातल्याचा प्रकार सिडकोत घडला आहे. निहाल हुसेन सूर्यवंशी (रा. पाथर्डी फाटा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रमिला हरिभाऊ लोणारी (रा. सिंहस्थनगर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. लोणारी यांचे सिंहस्थनगर भागात दुकान आहे. गेल्या वर्षी संशयित दुकानात आला. यावेळी त्याने कटलरी माल कमी भावात आणून देतो अशी बतावणी करीत महिलेकडून दोन लाख रुपये घेतले. वर्ष उलटूनही माल अथवा पैसे न मिळाल्याने पोलिसात धाव घेऊन तक्रर दिली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी