शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी येथे दोन बिबटे पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:35 IST

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत संतोष तिडके यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचे दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसात चार बिबटे अडकल्याने मोहाडी परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : दोन दिवसात अडकले चार बिबटे

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत संतोष तिडके यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचे दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसात चार बिबटे अडकल्याने मोहाडी परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहाडी व परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, त्यांनी काही दिवसांपूर्वी श्वानांना भक्ष्य केले होते, त्यानंतर येथील नागरिकांनी वनविभागास पिंजरा लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार वनविभागाने सोमवारी (दि. १९) पिंजरा लावला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.२२) दीड वर्षाचा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. शुक्रवारी (दि. २४) पुन्हा तीन वर्षाचा एक बिबट्या त्याच पिंजऱ्यात अडकला होता. दोन्ही बिबटे वनविभागाने ताब्यात घेत त्यांची नाशिकला रवानगी केली होती, त्याच ठिकाणी अजूनही बिबटे असल्याच्या संशयावरून वनविभागाने पुन्हा पिंजरा लावला असता शनिवारी (दि.२४) पहाटे त्या पिंजऱ्यात दीड वर्षाचे दोन बिबटे अडकले.या बिबट्याची मादी पकडण्यासाठी वनविभागाने व्यूव्हरचना आखली असून, पुन्हा एक पिंजरा त्या ठिकाणी लावण्यात आला आहे, तर दोन्ही बिबटे ज्या पिंजऱ्यात अडकले तो पिंजरा त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगुर्डे, वनपाल वैभव गायकवाड, वनरक्षक गोरख गांगुर्डे, उस्मान सय्यद, अनिल दळवी, उत्तम बागुल, माया म्हस्के, सुरेखा खजे, रेखा चौधरी, श्रावण कामडी, अण्णा टेकमाळ आदी लक्ष ठेवून आहेत. परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक शेतकरी राजेंद्र तिडके, रामकृष्ण मौले, संतोष तिडके, किरण खोडे, वैभव भार्गवे, दत्तात्रेय खोडे, विलास पाटील आदींनी केली आहे, तर पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी परिसरात भेट देत नागरिकांनी संपर्कात राहण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या