इगतपुरी : नवीन कसारा घाटात मध्यरात्री मोटार सायकलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाआहे.सोमवारी मध्यरात्री नवीन कसारा घाटात लतीफवाडी जवळ मोटार सायकल(क्र मांक एम एच ०४ जे डब्लू ८३४५)वरून जाणाऱ्या युवकांनी उभ्या असलेल्या ट्रक (क्र मांक एम एच१८ एम ६९०० ) ला मागून जोरदार धडक दिली. यात किरण अशोक कलचिडा(वय २१, रा आसनगाव) व साईनाथ अशोक कंकुषे (वय १७ रा. कसारा) या दोघांचा मृत्यू झाला तर विनायक भास्कर डावरे (वय १६ रा. कसारा) हा तरूण गंभीर जखमी झाला. विनायकला उपचारासाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात दाखल केले. किरण कालचिडा , साईनाथ कुंकुषे यांचे कसारा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातानंतर पिक इंप्रा महामार्ग सुरक्षा पथक व महामार्ग पोलीस यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
कसारा घाटात मध्यरात्री अपघातात दोन ठार; एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 18:19 IST
नवीन कसारा घाटात मध्यरात्री मोटार सायकलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाआहे.
कसारा घाटात मध्यरात्री अपघातात दोन ठार; एक गंभीर जखमी
ठळक मुद्देमोटरसायकलची उभ्या ट्रकला धडक; जखमीवर नाशकात उपचार