शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

घोटी येथे सिलिंडर स्फोटात दोघे जखमी

By admin | Updated: January 21, 2017 22:58 IST

घोटी येथे सिलिंडर स्फोटात दोघे जखमी

घोटी : शहरातील बाजार समितीच्या मागील वसाहतीत शनिवारी सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोनजण जखमी झाले. गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, याबाबत घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.
शहरातील बाजार समतिीच्या मागील बाजूस असणाऱ्या नागरी वसाहतीत अनेक कामगार भाडे तत्त्वावर राहतात. यात दगडू सोनवणे यांच्या चाळीत जिंदाल कारखान्यात काम करणारे चंद्रप्रकाश सूर्यबली चौहान हे आपल्या कुटुंबासह भाडे तत्त्वावर राहतात. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी उठले. त्यांनी गॅस चालू करण्याचा प्रयत्न केला असता, सिलिंडरने पेट घेतला. दरम्यान चंद्रप्रकाश चौहान यांनी आरडाओरड करीत पत्नीला व मुलांना घराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर झालेल्या स्फोटात स्वयंपाकघरातील किचन ओटा, दरवाजा, खिडक्या, कपडे आदिंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चंद्रप्रकाश चौहान हे भाजल्याने जखमी झाले आहेत. चौहान कुटुंबाचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी आलेले घरमालक अजय सोनवणे हेही यात जखमी झाले.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रीतम लोखंडे यांच्यासह जयप्रकाश नागरे, प्रशांत जाधव आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गॅस गळतीने सिलिंडरने पेट घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (वार्ताहर)