शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी काढून घ्याव्या - आदेश

By admin | Updated: January 7, 2015 01:58 IST

दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी काढून घ्याव्या - आदेश

नाशिक : पंचवटी विभागातील सर्व्हे नंबर २५७ आणि २५९ वरील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर म्हसोबावाडी नावाने अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या सुमारे दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी चार आठवड्यात काढून घ्याव्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, न्यायालयाच्या आदेशानंतरही झोपड्या न हटल्यास महापालिका कारवाई करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.पंचवटी विभागातील म्हसरूळ शिवारातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दक्षिण बाजूला असलेल्या सर्व्हे नंबर २५७ आणि २५९ वरील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर नोव्हेंबर २०१४ मध्ये अचानकपणे सुमारे दीडशे ते दोनशे झोपड्या उभ्या राहिल्या. महापालिकेने त्याची तातडीने दखल घेत २० नोव्हेंबर २०१४ रोजी पोलीस बंदोबस्तात झोपड्या हटविल्या होत्या. त्यावेळी झोपडीधारकांनी विरोध करत पोलीस ठाण्याच्या आवारात धरणे धरली होती. दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाची पाठ फिरताच झोपडीधारकांनी पुन्हा एकदा झोपड्या उभ्या केल्या होत्या. त्यानंतर बंदोबस्त पुरविण्यात पोलिसांचीही भूमिका संशयास्पद ठरली होती. पोलिसांकडून संबंधित अतिक्रमणधारकांशी चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढण्याचा सल्लाही देण्यात आला होता. या चर्चेला स्थानिक नगरसेवक रंजना भानसी यांनी आक्षेप घेतला होता. त्यातच झोपडीधारकांचे नेतृत्व करणारे जी. जी. चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाईला स्थगिती मिळविली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊन न्यायालयाने येत्या चार आठवड्यांत संबंधित अतिक्रमणधारकांना झोपड्या स्वत:हून काढण्याचे आदेश दिल्याची माहिती अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम आणि स्थानिक नगरसेवक रंजना भानसी यांनी दिली. न्यायमूर्ती ओक यांनी हा आदेश दिला असून, अतिक्रमणधारकांकडून तसे प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. जे. शेखर यांनी काम पाहिले. तत्पूर्वी याचिकाकर्त्यांनी शासनाकडेही या प्रकरणी अपील केले असून, शासनाच्या निर्णयाकडेही महापालिकेचे लक्ष लागून आहे.