सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:34 IST2019-02-14T12:28:42+5:302019-02-14T12:34:53+5:30

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कारने धडक दिल्याने दुचाकीहून घरी जाणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. खोपडी शिवारात गुरुवारी साडेसात वाजेच्या सुमारास ही भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

two dead in road accident near nashik | सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

सिन्नर (नाशिक) : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कारने धडक दिल्याने दुचाकीहून घरी जाणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. खोपडी शिवारात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

अनंत नवनाथ यादव (32) रा. वल्हेवाडी व पांडुरंग नामदेव पवार  (33) रा. कहांळवाडी हे तरुण कामगार मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील सुपर इंडस्ट्रीज कारखान्यातील रात्रपाळी करून दुचाकीहून सकाळी घरी परत येत होते. त्याच दरम्यान शिर्डीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Web Title: two dead in road accident near nashik