शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवऱ्हे सोने लुटीतील दोघांना अटक

By admin | Updated: April 29, 2015 23:37 IST

इगतपुरी न्यायालयात हजर : बारा दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ५८ किलो सोने लुटीच्या कटामध्ये सहभागी असलेले व वाहनाची इत्थंभूत माहिती दरोडेखोरांना देणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी बुधवारी अटक केली़ तपासाच्या कारणास्तव या दोघांचीही नावे गोपनीय ठेवण्यात आली असून, त्यांना इगतपुरी न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या दोघांच्या अटकेमुळे लवकरच या सोने लुटीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे़गेल्या शुक्रवारी (दि़२४) पहाटे तीन वाजेच्यासुमारास वाडीवऱ्हेजवळ पाच तोतया पोलिसांनी जिल्ह्णातील सर्वांत मोठा दरोडा टाकला़ ‘झी’ गोल्ड कंपनीचे ६० किलो सोने अंधेरी येथील सिक्वेल सिक्युरीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुरक्षा अधिकारी समीर मन्वर पिंजारा, वाहनचालक नावेद अहमद, सुरक्षारक्षक प्रदीप दुबे व संतोष साऊ हे शिरपूरच्या रिफायनरीमध्ये पोहोचविण्यासाठी वाहनाने (एमएच ०२ सीई ४०१०) जात होते़ महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ रंगाच्या लोगान कारमधून आलेल्या पाच तोतया पोलिसांनी हे वाहन अडविले़ या वाहनातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून ६० किलो सोन्यापैकी सोळा कोटी २३ लाख रुपयांचे ५८ किलो सोने घेऊन ते फरार झाले़ या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींबाबत धागेदारे सापडल्याचा दावा केला होता़ तसेच याबाबत ४० संशयितांची तपासणी करून सात पथकेही विविध ठिकाणी पाठविली होती़ या दरोड्याच्या घटनेला पाच दिवस उलटूनही तसेच धागेदोरी मिळूनही आरोपींना पकडण्यात यश येत नसल्याचे पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते़दरम्यान, या दरोड्याच्या कटात सामील असलेल्या दोघा संशयितांना पकडण्यात आल्यामुळे लवकरच प्रमुख संशयितांना अटक होण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)—कोट—सोने लुटीचा कट रचण्यामध्ये सामील असलेल्या दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतले आहे़ या दोघांनी मुख्य आरोपींना सोने कुठून व कोणत्या वाहनातून निघणार आहे याची टीप दिली होती़ तपासाच्या कारणास्तव या दोघांचीही नावे गोपनीय ठेवण्यात आली असून, त्यांना इगतपुरी न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे़- संजय मोहिते, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक़