शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विकणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:19 IST

मालेगाव मध्य : तालुक्यातील पिंपळगाव येथील दोन दुकानांमध्ये छापा टाकून विशेष पोलीस पथकाने पेट्रोल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाºया दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव मध्य : तालुक्यातील पिंपळगाव येथील दोन दुकानांमध्ये छापा टाकून विशेष पोलीस पथकाने पेट्रोल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाºया दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी तुषार आहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतच्या पत्र्याच्या शेडसमोरील् गंगासागर अ‍ॅटो गॅरेज अ‍ॅण्ड कोल्ड्रिंग दुकानात दुकानमालक सुनील माधव पवार (४०, रा. पिंपळगाव, ता. मालेगाव) ज्वलनशील पदार्थ पेट्रोल लोकांच्या जीवितास व मालमत्त्येस धोका निर्माण होईल अशा रीतीने बेकायदेशीररीत्या बाळगून होता. तो एकूण २६४० रुपये किमतीच्य एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये ३० लिटर पेट्रोल विक्री करताना मिळून आला. तसेच २ हजार १२४ रुपये किमतीच्या देशी दारू प्रिन्स संत्र्याच्या एकूण २७ बाटल्या आढळून आल्या.गंगाई मोबाईल शॉपी दुकानाचा मालक योगेश दिलीप पवार (३०) याच्या ताब्यात विदेशी दारूच्या इंपेरियल ब्लूच्या ३ बाटल्या, मॅगडॉल नं .१ च्या २ बाटल्या मिळून आल्या. याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल व १००० रुपयांचे दोन मोबाइल असा एकूण ४० हजार ६३४ रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संशयिताविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक