ंमालेगाव : धावत्या बसमधून बसलेल्या प्रवाशी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरुन तालुका पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव फाटा सायने खुर्द शिवारात ही घटना घडली. सुकन्या खिमजी पटेल (३८) रा. वामखेडा, जि. धुळे यांनी फिर्याद दिली. सदर महिला नाशिक-धुळे बसने प्रवास करीत असताना तिच्या मागच्या सीटवर बसलेला आनंद विजयकुमार पेंढारकर (२७) रा. मालपुररोड, दोंडाईचा याने तिच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद देण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}