शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

वसाका सुरू करण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: September 28, 2014 23:25 IST

संतोष मोरे : वार्षिक सर्वसाधारण सभा

लोहोणेर : गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत असलेला वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके आगामी हंगामात कोणत्याही परिस्थितीत फिरण्यात येतील त्यासाठी संचालक मंडळाला सर्वांनी सहकार्य करावे व संचालक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे, असे आवाहन वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संतोष मोरे यांनी वार्षिक विशेष सर्वसाधारणप्रसंगी केले.वसाकाची वार्षिक सभा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर आवारात शांततेत झाली. विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले. यावेळी मोरे म्हणाले की, वसाका सुरू करण्यासाठी ज्येष्ठ संचालक दौलतराव अहेर व शांताराम अहेर यांनी प्रयत्न केले. वसाका कामगारांसह इतर देणी टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. त्यात कामगारांना प्रथम प्राधान्य राहील. उत्पादन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सभासद शेतकऱ्यांनी किमान १ एकर ऊसाची लागवड करावी, असे आवाहन केले. यावेळी प्रभाकर पाटील, अशोक देवरे, शांताराम जाधव, अ‍ॅड. शशिकांत पवार, नारायण पाटील, बा. ना. पाटील, यशवंत पाटील, शिवाजी हिरे, भरत पाळेकर, फुला जाधव, बी. डी. देसले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)निफाड मतदारसंघात जनजागृती मोहीमनिफाड :निफाड विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ. शशीकांत मंगरुळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड मतदार संघातील विविध गावात मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. पिंपळगाव (ब), सायखेडा या व इतर गावातही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. संबंधीत गावातील विद्यार्थ्यांनी हातात मतदान करा, हक्काचे मतदान करा अशा आशयाचे फलक घेऊन रॅली काढली. या गावातील नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या रॅलींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.(वार्ताहर)