त्र्यंबकेश्वरला रथोत्सव उत्साहात

By Admin | Updated: April 8, 2017 23:46 IST2017-04-08T23:46:45+5:302017-04-08T23:46:59+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील श्री राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री राममंदिरातील भगवान श्री राम, सीता, लक्ष्मणाच्या मूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती.

Trimbakeshwar rathotsav enthusiasm | त्र्यंबकेश्वरला रथोत्सव उत्साहात

त्र्यंबकेश्वरला रथोत्सव उत्साहात

 त्र्यंबकेश्वर : येथील श्री राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आळी विभागातील श्री राममंदिरातील भगवान श्री राम, सीता, लक्ष्मणाच्या मूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती.
रथ पाच आळीतून कुशावर्त तीर्थाच्या पाठीमागून महाजन चौक येथे नेण्यात आला. श्रीराम रथ महाजन चौकातून मिरवण्याची पूर्वापार प्रथा आहे. ती आजही पाळली जाते. महाजन चौकातून कुशावर्त तीर्थावर मूर्ती नेण्यात आली. कुशावर्ताहून त्र्यंबकेश्वर मंदिर, मारुती मंदिराकडे नेली. रथ मारुती मंदिरापर्यंत घेऊन जाणे शक्य नसल्याने रथापासून मानवी साखळी करून प्रभुरामचंद्रांचे दर्शन श्रीरामभक्त हनुमानाला घडवत व हनुमानाचा स्पर्श भगवान श्रीरामाला घडविला. यावेळी रघुपती राघव राजाराम परतीत पावन सीताराम अशी भजने म्हटली जात होती.
रथावर रोषणाईचा झगमगाट होता. मिरवणूक मार्गावर जागोजागी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. सुवासिनी आरक्षण करीत
होत्या. ठिकठिकाणी जल्लोष होत होता. (वार्ताहर)

Web Title: Trimbakeshwar rathotsav enthusiasm