शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला विनामास्क नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:51 IST

त्र्यंबकेश्वर : सध्या कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देअशिक्षित व गरीब ग्रामस्थांकडून दोनशे रुपये दंड

त्र्यंबकेश्वर : सध्या कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.त्र्यंबक हे तीर्थक्षेत्र असल्याने शहरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी शुभम गुप्ता व तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यापक मोहीम कुशावर्तापासून सुरू करण्यात आली आहे.कोविडने सर्वत्र पुन्हा उसळी मारली असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या सुस्थितीतील नागरिकांकडून एक हजार रुपये, ग्रामीण भागातील अशिक्षित व गरीब ग्रामस्थांकडून दोनशे रुपये दंड म्हणून आकारणी केली जात आहे.सध्या त्र्यंबकेश्वरला एकही कोविड केअर सेंटर नाही. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब घेतले जातात. मात्र, रुग्णांना जिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेकडे व लोकांनादेखील माहिती दिली जात नाही. जिल्ह्यात नाशिक, मालेगाव व सिन्नर, निफाड, देवळा आदी भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. उर्वरित कमी रुग्णसंख्या असलेल्या भागात कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे.उर्मट तसेच साथीचे संसर्गजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अशा २६८ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आदी ही मोहीम राबवित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य