शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जनतेला सरकारी बाबूंकडूनच कोरोनाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 18:58 IST

सुरगाणा : जिल्ह्यात अद्यापही कोरोना मुक्त राहिलेल्या सुरगाणा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी न रहाता अप डाऊन करत असल्याने तालुकावासियांसाठी काळजीचे कारण बनले असून या सर्वांना मुख्यालयीच रहावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे येथील तहसिलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुरगाणा : मुख्यालयी राहण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी

सुरगाणा : जिल्ह्यात अद्यापही कोरोना मुक्त राहिलेल्या सुरगाणा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी न रहाता अप डाऊन करत असल्याने तालुकावासियांसाठी काळजीचे कारण बनले असून या सर्वांना मुख्यालयीच रहावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे येथील तहसिलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, सुरगाणा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. शासनाने निर्धारित केलेल्या लॉकडाउनची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आज पर्यंत तालुका कोरोनामुक्त राखण्यात यश आले आहे. तालुक्यातील बरेचसे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत ते नाशिक, मालेगांव, सिन्नर, चांदवड, येवला तसेच कोरोनाग्रस्त भागातून ये- जा करीत आहेत. यामध्ये महसूल विभाग, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोस्ट कार्यालय, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र आदी कार्यालयातील अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी मुख्यालय न राहता ये जा करीत आहेत. या सरकारी बाबूनां मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जावी. जे मुख्यालयी राहत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता, घरभाडे भत्ता, प्रोत्साहनपर दिला जाणारा भत्ता या सवलती बंद करण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर आदिवासी सेवक चिंतामण गावित, शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, गोपाळराव धुम, भिका राऊत, पांडुरंग गायकवाड, आनंदा झिरवाळ, हरिभाऊ भोये, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल भोये, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित, नगरसेवक रमेश थोरात आदिंच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, तहसिलदार विजय सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrible Development Schemeआदिवासी विकास योजना