आदिवासी भागात आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:57 IST2017-09-11T00:57:46+5:302017-09-11T00:57:54+5:30

शहरात शासकीय रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांतून आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने रुग्णांची सोय होते. परंतु दुर्गम आदिवासी पाड्यांवर आणि ग्रामीण भागात फारशी आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांचे हाल होतात.

Tribal Area Health Care | आदिवासी भागात आरोग्यसेवा

आदिवासी भागात आरोग्यसेवा

नाशिक : शहरात शासकीय रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांतून आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने रुग्णांची सोय होते. परंतु दुर्गम आदिवासी पाड्यांवर आणि ग्रामीण भागात फारशी आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांचे हाल होतात. त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जोपासणाºया मायको एम्प्लॉइज फोरमच्या वतीने काचुर्ली, तळेगाव, गोविंदपूर येथे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राचा सुमारे २७ पाड्यांना लाभ होत आहे.
सामाजिक पर्यावरण व आरोग्य आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मायको एम्प्लॉइज फोरम या संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी येथे दर रविवारी गत दहा वर्षांपासून तसेच राजेवाडी येथे दर मंगळवारी गत दोन वर्षांपासूून साप्ताहिक आरोग्ससेवा केंद्र चालविण्यात येत आहे. या आरोग्य केंद्राचा परिसरातील २७ पाड्यांचे रहिवासी लाभ घेतात. तसेच आहार, स्वच्छता, शिक्षण या विषयीचे उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येते.

Web Title: Tribal Area Health Care