शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांनी लावले होते झाड, चार वर्षांनंतर जागा ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST

ओझर : राज्यात फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधिमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत करण्याची घोषणा बुधवारी (दि.४) उपमुख्यमंत्री ...

ओझर : राज्यात फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधिमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत करण्याची घोषणा बुधवारी (दि.४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली असतानाच तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ओझर येथे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वहस्ते लागवड केलेला वृक्षच जळून गेल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे जेथे वनमंत्र्यांनी लावलेल्या वृक्षाचेच नीटसे संवर्धन झालेले नाही, तेथे अन्य लागवडीची काय कथा, असा प्रश्न त्यानमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात ‘एकच लक्ष, ३३ कोटी वृक्ष’ या मोहिमेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी ओझर येथे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला होता. त्यानंतर ओझर येथीलच किनो थिएटरला कार्यक्रमही पार पडला होता. सन २०१७ मध्ये दि. १ ते ७ जुलै या सप्ताहात राज्य सरकारने वनमहोत्सवाचे आयोजन केले होते. या सप्ताहात चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ऐन पावसाळ्यात हे मिशन राबविले गेल्याने कमी वेळेत जास्त कार्यक्रम ही भूमिका घेत वनमंत्र्यांनी विमानाने जाऊन राज्यात एकाचवेळी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यानुसार दि. ४ जुलै २०१७ रोजी तत्कालीन वनमंत्री नाशिकला ओझर विमानतळ येथे उतरणार असल्याने वेळेचे गणित लक्षात घेता परिसरातील जवळच्या जागेतच वृक्षलागवडीचे नियोजन चांदवडच्या वनाधिकाऱ्यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, वनाधिकाऱ्यांनी एचएएल प्रशासनाला विनंती केल्यानंतर एचएएलमधील गणपती मंदिराजवळील जागा वृक्षलागवडीसाठी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार रेड कार्पेट आंथरत वनमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम थाटात पार पडला होता. यावेळी भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र, चार वर्षांनंतर आता संबंधित जागेत ओसाड माळरान असून, खुद्द वनमंत्र्यांनी लावलेला वृक्षही वनविभागाला जोपासता आलेला नसल्याचे दिसून आले. ज्याठिकाणी वनमंत्र्यांनी वृक्षलागवड केली त्याठिकाणी केवळ एक खड्डा उरला आहे. वृक्षासोबत लावण्यात आलेली वनमंत्र्यांच्या नावाची पाटीही तेथून गायब झालेली आहे.

इन्फो

लागवड अन‌् फोटोसेशन

राज्य शासनाच्या वनमंत्रायलयामार्फत त्यावेळी ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते आणि तशी पूर्तताही करण्यात आली होती. परंतु, वृक्षलागवडीनंतर एखाद्यावर जबाबदारी निश्चित करून त्याचे ज्या पद्धतीने संवर्धन व्हायला हवे होते, ते होत नाही. त्यामुळे वृक्षलागवड मोहीम ही बऱ्याचदा केवळ फोटोसेशनपुरताच मर्यादित ठरत आलेली आहे. ओझर येथे खुद्द वनमंत्र्यांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड वनविभागाला जोपासता आले नाही. त्यामुळे वनविभागाच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल आणि जिल्ह्यातील वृक्षलागवडीवरही त्यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फोटो : ०४ ओझर ट्री-१

४ जुलै २०१७ : राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते एचएएल परिसरात करण्यात आलेले वृक्षारोपण.

फोटो- ०४ओझर ट्री-२

४ मार्च २०२१ ज्याठिकाणी वृक्षारोपण झाले होते त्या परिसरात ओसाड पडलेले माळरान.

===Photopath===

040321\04nsk_18_04032021_13.jpg~040321\04nsk_19_04032021_13.jpg

===Caption===

 फोटो : ०४ ओझर ट्री-१४ जुलै २०१७ : राज्याचे तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते एचएएल परिसरात करण्यात आलेले वृक्षारोपण. ~फोटो- ०४ओझर ट्री-२४ मार्च २०२१ ज्याठिकाणी वृक्षारोपण झाले होते त्या परिसरात ओसाड पडलेले माळरान.