शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीस हरकत;सुनावणीकडे मात्र पाठ फिरवली.

By admin | Updated: December 28, 2014 01:11 IST

वृक्षतोडीस हरकत;सुनावणीकडे मात्र पाठ फिरवली.

नाशिक : शहरातील दोन हजार वृक्षतोडीस हरकत घेणाऱ्या उत्साही मंडळींनी महापालिकेत शनिवारी झालेल्या सुनावणीकडे मात्र पाठ फिरवली. ६६ हरकतदारांना पाचारण करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र १९ जणांनीच हजेरी लावली. वृक्षगणनेशिवाय वृक्षतोड करू नये, अशी मागणी करतानाच अनेकांनी आधी रस्त्यालगतची अतिक्रमणे काढा, मगच वृक्षतोडीच्या पर्यायाचा विचार करा अशा सूचना केल्या आहेत.कुंभमेळ्याच्या पाश्वभूमीवर शहराच्या विविध भागांत रस्ते विकास करण्यात येत असून, त्यात बाधित होणाऱ्या दोन हजार झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यास अनेक वृक्षप्रेमींनी हरकत घेतली आहे. नाशिक शहरातील वृक्षतोडीसंदर्भात या आधीच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील वृक्षतोडीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीस हरकत किंवा सूचना करणाऱ्यांना वनखात्याच्या वनसंरक्षक कार्यालयात निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार १३४ व्यक्ती आणि संस्थांनी हरकती घेतल्या. त्यावर आता दोन दिवस सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत समितीचे अध्यक्ष तथा वनसंरक्षक अरविंद पाटील आणि सदस्य डॉ. दिगंबर मोकाट तसेच डॉ. संदीप जाधव यांच्या समितीसमोर शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस हरकतींची सुनावणी घेण्यात येणार आहे. शनिवारी ६६, तर रविवारी ६७ हरकतदारांना पाचारण करण्याचे नियोजन होते. परंतु पहिल्याच दिवशी ६६ पैकी केवळ १९ हरकत घेणारेच उपस्थित होते. त्यामुळे अगोदर हरकत घेणाऱ्यांचा उत्साह अचानक कसा मावळला असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)