नाशिकच्या चांदवड तालुक्यात ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सुदैवाने ३९ प्रवाशी बचावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 09:05 IST2025-08-18T09:05:07+5:302025-08-18T09:05:25+5:30
नाशिकमध्ये ट्रॅव्हल्स अपघातानंतर बसने पेट घेतल्याची घडली.

नाशिकच्या चांदवड तालुक्यात ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सुदैवाने ३९ प्रवाशी बचावले!
महेश गुजराथी: इंदौरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हलस कंपनीच्या बसला चांदवड तालुक्यातील आडगावच्या शिवारात स्वागत हॉटेलच्या अलीकडे सोमवारी आग लागण्याची घटना घडली. पहाटे सव्वापाच वाजता टायर फुटल्यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतला. आग लागल्याने बसमधील सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. सुदैवाने बसमधील सर्वच ३९ प्रवाशी बचावल्याचे सांगण्यात आले. तर एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.