पेठ : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना दिंडोरी येथे प्रशिक्षण देण्यात आले़ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले़ प्रोजेक्टच्या साह्याने कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया समजून देण्यात आली़ तसेच निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारे मशीन हाताळण्याबाबत कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले़पेठ व दिंडोरी तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना या निवडणूक कामात सामावून घेण्यात आले आहे़ यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी, कैलास कडलग यांच्यासह निवडणूक नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते़ (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}