शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी सुटता सुटेना!

By admin | Updated: September 1, 2016 22:36 IST

मोहदरी घाट : सिन्नर-नाशिक प्रवास बनला डोकेदुखी; रोजच्या त्रासाने चाकरमाने, विद्यार्थी हैराण

 सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर सिन्नरजवळील मोहदरी घाटात दोन ट्रक नादुरुस्त झाल्याने सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गेल्या काही दिवसांपासून सिन्नर-नाशिक प्रवास डोकेदुखी ठरत आहे.सिन्नर - नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाला गेल्या अनेक वर्षांपासून मुहूर्त मिळत नव्हता. सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर या मार्गाचे काम सुरू झाले. गेल्या तीन महिन्यांपासून मोहदरी घाट रुंद करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मोहदरी घाटात रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच या घाटात अवजड वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादे अवजड वाहन नादुस्त झाल्यास किंवा अपघात झाल्यास प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोहदरी घाटात एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्यात उभा होता. बेशिस्त वाहनचालकांमुळे सकाळी ७ वाजेपासून वाहतूक कोंडीस प्रारंभ झाला. एमआयडीसी पोलिसांनी मोहदरी घाटात धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पुन्हा मोहदरी घाटात दुसरा ट्रक नादुरुस्त झाला. त्यामुळे पूर्ववत होऊ पाहणारी वाहतूक कोंडी पुन्हा वाढली. त्यानंतर महामार्ग वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी.आर. मोकळ, पी.एम. बहिरम, बी.एन. शिंदे, आनंददीप पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. मोहदरी घाटात सोमवारीही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीचा पाण्याचा टॅँकर रस्त्यावर घसरल्याने सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याचे काम सुरूअसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून आठवड्यातील तीन ते चार दिवस मोहदरी घाटात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे दररोज सिन्नर-नाशिक जा-ये करणाऱ्या चाकरमान्यांचे व शिक्षणासाठी नाशिकला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. प्रवाशांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)