शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना ‘एप्रिल’ फूल

By admin | Updated: March 18, 2015 23:50 IST

एलबीटी : आॅगस्टपासून रद्दच्या घोषणेमुळे नाराजी

नाशिक : व्यापाऱ्यांना त्रासदायक वाटणारा स्थानिक स्वराज्य संस्था कर म्हणजेच एलबीटी हा १ एप्रिलपासून रद्द करण्याच्या घोषणेबाबत युती सरकारने घूमजाव केले असून, व्यापाऱ्यांना चक्क एप्रिल फूल केले आहे. एप्रिल ऐवजी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करणार असल्याचे सरकारने जाहीर केले असले, तरी त्याविषयी व्यापाऱ्यांबरोबरच उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता जीएसटी लागू करण्याच्या नावाखाली पुन्हा हा निर्णय लांबणीवर टाकला जाण्याची भीती संबंधितांनी व्यक्त केली आहे.राज्यात भाजपा सेनेचे सरकार येण्यापूर्वीच त्यांनी व्यापाऱ्यांच्या एलबीटी हटाव भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर मात्र केंद्र सरकार सर्व कर रद्द करून एकमेव जीएसटी लागू केल्यानंतर एलबीटी लागू करू, असे सांगत सरकारने वेळोवेळी भूमिका बदलली आणि आता १ एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून एलबीटी रद्द करू असे सांगताना बुधवारी अर्थसंकल्प सादर करताना १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी खूश होण्याऐवजी नाराजीचा सूर काढला आहे.नाशिकमधील फामचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी राज्य सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. १ एप्रिलपासून एलबीटी रद्द करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच जाहीर केले होते; मात्र आता घूमजाव करीत १ आॅगस्टपासून एलबीटी लागू करणार असल्याचे जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी राज्य सरकारकडून व्यापाऱ्यांची फसगत होत असल्याचा आरोप केला. आता १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले; परंतु पुन्हा पुढील आर्थिक वर्षापासून जीएसटी सुरू होणार असल्याने तोपर्यंत एलबीटीला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे, असे मत व्यक्त केले. निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी कर भरतानाच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करावे, अशी उद्योजकांची इच्छा होती. मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीऐवजी मध्येच एलबीटी रद्द करून गोंधळ निर्माण होईल, असे सांगितले, तर आॅल इंडिया फेडरेशन आॅफ क्लॉथ रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द मात्र व्हॅटमध्ये सरचार्ज वाढणार असल्याने नगरपालिकांमधील व्यापाऱ्यांना त्याचा भुर्दंड बसेल, असे सांगितले. (प्रतिनिधी)