शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भगूरला तिरंगी लढती

By admin | Updated: November 13, 2016 23:06 IST

भगूरला तिरंगी लढती

भगूर : नगरपालिकेच्या निवडणुकीत १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवकपदासाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ४ अपक्ष आणि तीन नगराध्यक्षपदासाठी सज्ज झाले आहेत. माघारीनंतर हे चित्र स्पष्ट होऊन अनेक दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती रंगणार आहेत. दोन ठिकाणी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला, तर एका ठिकाणी भाजपाला उमेदवारच मिळू शकलेला नसल्याचे दिसत आहे. प्रभाग १ अ हा महिला अनु. जातीसाठी राखीव असून, येथे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक स्वाती झुटे लढत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून निवडून येऊन नंतर बंडखोरी करून शिवसेनेत जाऊन त्या नगराध्यक्ष झाल्या. या बंडखोरीबद्दल उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दावा सुरू असूनही त्या उमेदवारी करत आहे, तर त्यांच्या विरुद्ध भाजपाच्या कविता जाधव या आहेत. येथे आघाडीचा उमेदवार नसल्याने दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १ ब हा सर्वसाधारण प्रभाग असून, भाजपातर्फे विद्यमान नगरसेवक शांताराम शेटे, शिवसेनेकडून शेतकरी सोसायटी संचालक भाऊसाहेब गायकवाड, तर आघाडीतर्फे मोहम्मद अन्सारी यांच्यात तिरंगी लढती होणार आहेत. प्रभाग २ अ हा महिला अनु. जातीसाठी राखीव असून, शिवसेनेच्या अश्विनी साळवे, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन गांगुर्डे यांच्या पत्नी सुवर्णा पगारे या भाजपाच्या आणि पौर्णिमा मेश्राम आघाडीतर्फे तिकिटावर लढत आहेत. येथे तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग २ ब हा सर्वसाधारण असून, येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे शिवसेनेच्या वतीने तर माजी नगराध्यक्ष भारती साळवे आघाडीतर्फे आणि प्रसाद आडके भाजपाच्या तिकिटावर लढत आहेत. प्रभाग ३ अ हा ओबीसी राखीव असून, शिवसेनेतर्फे उत्तम आहेर, तर भाजपाकडून माजी नगरसेवक सुनील जाधव आणि आघाडीच्या वतीने विशाल बलकवडे लढत आहेत. प्रभाग ३ ब हा जनरल महिलांसाठी राखीव असून, मनसेचे शहराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या पत्नी जयश्री देशमुख शिवसेनेतर्फे तर सुलेभा देशमुख भाजपाच्या वतीने आणि सत्यभामा मोजाड आघाडीकडून उमेदवारी करत असून, तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग ४ अ ओबीसी राखीव असून, सुरेश वालझाडे हे शिवसेना व मधुकर कापसे भाजपा आणि योगेश लकारिया हे आघाडीतर्फे लढत आहे. प्रभाग ४ ब हा जनरल महिला राखीव असून, शकुंतला कुंडारिया (शिवसेना), लता इंदारखे (भाजपा) आणि सुरेखा मोहिते (आघाडी) तर प्राजक्त बागडे या अपक्ष असल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग ५ अ हा अनु. जाती महिलांसाठी राखीव असून, संगीता पिंपळे (शिवसेना), प्रियंका पवार (भाजपा), तर शिल्पा जाधव (आघाडी) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग ५ ब हा जनरल असून, येथे काँग्रेसचे शहरप्रमुख मोहन करंजकर (आघाडी), युनूस शेख (भाजपा)े आणि संतोष ओहोळ (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.