शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पेठ बालगृहातील मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:04 IST

पोस्कोन्वये गुन्हा दाखल; अध्यक्षाची आत्महत्येची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक जिल्हा आदिवासी महिला हक्क संरक्षण समिती संचलित पेठ येथील मुलींच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीवर समिती अध्यक्षाच्या मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे़ नासर्डी पुलावरील मुलींच्या शासकीय अनुरक्षणगृहात सज्ञान झाल्याने हलविण्यात आलेल्या पीडित मुलीने हा प्रकार अधीक्षकांना सांगितल्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात धाव घेतली़ या प्रकरणी संशयित अतुल शंकर अलबाड विरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा आदिवासी महिला हक्क सरंक्षण समिती पेठ यांचे पेठला मुलींचे बालगृह आहे. या बालगृहात २०१३ मध्ये अनाथ पीडित मुलीस भरती करण्यात आले़ या बालगृहाच्या अध्यक्षांचा मुलगा अतुल अलबाड याने २०१५च्या दिवाळीत अत्याचार केल्याचे पीडितेने अध्यक्ष सुशीला अलबाड यांना सांगितल्ोही, मात्र त्यांनी तूच माझ्या मुलाच्या मागे लागण्याचा आरोप करून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने संशयिताने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे़शासनाच्या नियमानुसार पीडित मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिला नासर्डी पुलावरील मुलींच्या शासकीय अनुरक्षणगृहात बुधवारी (दि़१२) दाखल करण्यात आले़ या पीडित मुलीने अधीक्षक एस़ डी़ गांगुर्डे यांना आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ त्यांनी पीडित मुलीला सोबत घेऊन मुंबई नाका पोलीस ठाणे गाठले़ या पीडित मुलीने संशयित अतुल अलबाड विरोधात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला असून तो तपासासाठी पेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे़विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हपेठमधील बालगृहात आजमितीस ५६ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत़ अधीक्षक गांगुर्डे यांच्याकडे पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनुसार संशयित अतुल अलबाडने आपल्याबरोबरच इतर मुलींवरही लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केला आहे़ त्यामुळे बालगृहातील या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़आत्महत्येची धमकी अधीक्षक गांगुर्डे यांच्याकडे पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे़ तसेच या पीडित मुलीच्या दाखल्यासाठी अधीक्षकांनी अध्यक्ष सुशीला अलबाड यांना फोन केला होता़ त्यांनी आपल्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यास तुम्हा सर्वांची नावे चिठ्ठीत लिहून मी आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचा लेखी अहवाल गांगुर्डे यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना दिला आहे.