नाशकात पावसाच्या मुसळधार सरी; रस्ते जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:27 IST2020-06-27T16:22:52+5:302020-06-27T16:27:11+5:30
नाशिक शहर व परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळेलल्या मुसळधार सरींमुळे शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक भागातील वर्दळ मंदावली होती. परंतु पावसाचा जोर ओसरताच विविध भागात पुन्हा नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले.

नाशकात पावसाच्या मुसळधार सरी; रस्ते जलमय
नाशिक : शहर व परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळेलल्या मुसळधार सरींमुळे शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक भागातील वर्दळ मंदावली होती. परंतु पावसाचा जोर ओसरताच विविध भागात पुन्हा नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले.
गेल्या आठवडाभर ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले.काही काळ शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले. तर उपनगर परिसरात जोरदार सरींमुळे रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. मात्र शनिवारी सकाळपासूनच नाशकात प्रचंड उकाडा जाणवत असताना दुपाच्या सुमारा पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतून प्रभावित झाली. काही काळ जोरदार पाऊस झाल्यानंतर काही वेळ रिमझीम पाऊस सुरू असला तरी नागरिकांनी त्यांचे दैनंदिन व्यावहार पूर्ववत सुरू केले. नाशिक शहरात गेल्या पंधरवड्यात सलग तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने शहरातील विविध भागात पाणी साचले होते. मेनरोड, दहीपूल परिसरातील दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तारंबळ उडाली होती. परंतु त्यानंतर सलग दहा ते बारा दिवसाांसून पावसाने ओढ दिल्यामुळे परिसरातील नाशिककरांना पुन्हा पावसाची प्रतिक्षा लागली होती. अशा परिस्थितीत शुक्रवार पासून पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे शहरवासियांसह परिसरातील शेतकऱयांनाही दिलासा मिळासा आहे.
विजेच्या कडकडाटाने भीती
शहरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असताना अचानक विज कडाडण्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे शहर परिसरातील नागिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले, शहरातील मध्यवर्ती कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारीही या अचानक झालेल्या आवाजना दचकल्याचे पाहायला मिळाले.