आज कृषी पुरस्कारांचे वितरण

By Admin | Updated: June 30, 2015 23:43 IST2015-06-30T23:41:45+5:302015-06-30T23:43:23+5:30

आज कृषी पुरस्कारांचे वितरण

Today the distribution of agricultural awards | आज कृषी पुरस्कारांचे वितरण

आज कृषी पुरस्कारांचे वितरण

  नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे उद्या (दि.१) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी दिली. मागील वर्षीच आॅगस्ट २०१४ मध्ये या कृषी पुरस्कारांची घोषणा झाली होती. त्यात वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार शरदराव पुंडलिकराव ढोकरे (दिंडोरी), शेतीनिष्ठ- उल्हास बहिरू जाधव (शेणीत, इगतपुरी), शेतीनिष्ठ- दिलीप जेजीराम सूर्यवंशी (केळझर, बागलाण), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) सदाशिव वामनराव शेळके (येवला), उद्यान पंडित- सुरेश काशीनाथ कदम (येवला) व शेतीनिष्ठ- दत्तू राजाराम ढगे (बेलगाव ढगा, नाशिक) आदि सहा शेतकऱ्यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उद्या कृषी दिनानिमित्त सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत या पुरस्काराचे वितरण एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच कृषी समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Today the distribution of agricultural awards