शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

८० कोटींचे थकले देणे : तीन विभागांची अंदाजपत्रकात केलेली तरतूद संपुष्टात

By admin | Updated: September 30, 2014 23:25 IST

पालिकेत आर्थिक आणीबाणी

नाशिक : अपुरा निधी आणि कामांचा ताण जास्त यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली असताना, पाणीपुरवठा, बांधकाम आणि विद्युत या तीन विभागांसाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेली तरतूदच संपुष्टात आली आहे. आयुक्तांनी केलेली तरतूद संपुष्टात आली असल्याने आता त्याऐवजी स्थायी समितीने फुगवलेल्या निधीनुसार खर्च करायचा, तर त्यासाठी निधीच शिल्लक नसल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नवीन कामे तर नाहीच उलट ८० कोटी रुपयांची देयके थकली आहेत.एलबीटी लागू झाल्यानंतर मुळातच उत्पन्नात घट झाली आहे. त्यातच निधीची उपलब्धता लक्षात न घेता गेल्या काही वर्षांत सर्रास कामे मंजूर करण्यात येत असल्याने दायित्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच कुंभमेळ्याच्या कामांचा बोजा पडला आहे. अशा स्थितीत कामे करणे जिकिरीचे असल्याने गेल्या तीन ते चार प्रभारी आयुक्तांनी पालिकेची कामे स्लोडाऊन केली आहेत. तरीही आर्थिक ताण वाढला आहे. फेबु्रवारी महिन्यात पालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले. १८७५ कोटी ६९ लाख रुपयांच्या या अंदाजपत्रकात बांधकाम, जलदाय व्यवस्था, विद्युत विभाग, भूसंपादन, पाणीपुरवठा अशा वेगवेगळ्या विभागांसाठी तरतूद करण्यात आली होती. स्थायी समितीने अंदाजपत्रक फुगवल्यानंतर त्यात ही तरतूद वाढविण्यात आली. बांधकाम विभागासाठी १३५५ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागासाठी ८७ कोटी रुपये, विद्युत विभागासाठी २४ कोटी ५१ लाख रुपये अशा विविध प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या; परंतु तत्पूर्वी आयुक्तांनी या विभागाकरिता केलेल्या तरतुदींची रक्कमच संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न संबंधित विभागांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या विभागांची देयके बाजूला ठेवण्यात आली असून, देयकांची ही रक्कम ८० कोटी रुपयांच्या घरात आहे. स्थायी समितीवर आयुक्तांनी सादर केलेल्या रकमेची तरतूद संपुष्टात आल्याने आता स्थायी समितीने केलेल्या शिफारसीनुसार निधी द्यावा, अशी संबंधित विभागांची मागणी आहे; परंतु आयुक्तांनी अपेक्षित केलेले उत्पन्नच मिळालेले नसताना स्थायी समितीने आणखी फुगवून उत्पन्नवाढ दर्शविली. त्यावर आधारित केलेल्या तरतुदींचा विचार कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)