शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

पिंपळगाव बसवंत शहरात लाकडाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:43 PM

पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाणही अचानक वाढले गेल्याने शहर तसेच परीसरात आता कोरोनाची भीती वाढतच आहे. येथे केवळ दोन अमरधाम शहरात असून मुख्य अमरधाम येथे तीन अंत्यविधी एका वेळेस होतील असी व्यवस्था आहे. आता सदरची जागाही कमी पडत आहे एकाच दिवसात सात अंत्यसंस्कार केले जात असल्याने ही जागा अपुरी पडू लागली आहे.

ठळक मुद्दे मजूरच मिळत नसल्यामुळे आता लाकडांचा तुटवडा

पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाणही अचानक वाढले गेल्याने शहर तसेच परीसरात आता कोरोनाची भीती वाढतच आहे. येथे केवळ दोन अमरधाम शहरात असून मुख्य अमरधाम येथे तीन अंत्यविधी एका वेळेस होतील असी व्यवस्था आहे. आता सदरची जागाही कमी पडत आहे एकाच दिवसात सात अंत्यसंस्कार केले जात असल्याने ही जागा अपुरी पडू लागली आहे.त्यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांची कमतरता भासू लागली असून शहरातील काही प्रमुख लाकूड विक्रेत्यांकडे केवळ मर्यादित साठा उपलब्ध असल्याने परिस्थिती बिघडू लागली आहे. लाकूड तोडायला मजूरच मिळत नसल्यामुळे आता लाकडांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.आजपर्यंत निफाड तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बाधित रुग्णसंख्या ९३५४ असून उपचार घेत असलेले २२७२ आहे तर आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला आहे.मागील काही दिवसांपासून पूर्वी नाशिक येथे कोरोनाबाधित मृत्यू झाल्यास नाशिकच्याच अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते; परंतु नाशिकची परिस्थिती भयानक झाल्याने कोरोनाचे मृतदेह आता आपापल्या गावी नेऊन जाऊन अंत्यसंस्कार करण्यात येत असून पिंपळगाव बसवंत परिसरातील मृतदेह वाढल्याने आता या पुढे लाकडांच्या टंचाईला सामोरे जावे लागणार, अशी परिस्थिती होऊ लागली आहे.अनेक वर्षांपासून लाकूड तोडण्याचे काम करणारे मजूर आता येथे येण्यास तयार नाहीत. सध्या दोन, तीन दिवस पुरेल इतकाच लाकूडसाठा आहे.- योगेश दळवी, लाकूड विक्रेता, पिंपळगाव बसवंत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक