शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नसताना घंटागाडीची निविदा

By admin | Updated: January 21, 2016 23:22 IST

प्रक्रियेला लागणार बे्रक : अद्याप अपील दाखल नाही

नाशिक : घंटागाडीच्या ठेक्यामागचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. महापालिका प्रशासनाने अखेर पाच वर्षांच्या कालावधीकरिता घंटागाडीचा ठेका देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली, परंतु महापालिकेचा कामगार परवानाच रद्द झालेला असल्याने सदर निविदाप्रक्रिया बेकायदेशीर ठरविली जाण्याची शक्यता आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयानेही त्यास दुजोरा दिला असून, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतरही महापालिकेने त्यावर अद्याप अपील दाखल केले नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. परवानाप्राप्त होत नाही तोपर्यंत घंटागाडीचे पुन्हा एकदा भिजत घोंगडे पडण्याची शक्यता आहे. कामगार आयुक्तालयाने २०११ मध्ये महापालिकेचा नोंदणी दाखला रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठविला होता. त्यानंतर कामगार हिताच्या निर्णयात होणारे दुर्लक्ष व त्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेता कामगार कार्यालयाने महापालिकेला नोटिसाही बजावल्या होत्या. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कंत्राटी ठेक्याबाबतही कामगार विरुद्ध महापालिका यांच्यात संघर्ष उभा राहिला होता. शिवाय घंटागाडी कामगार, पेस्ट कंट्रोलचे काम करणारे कर्मचारी यांनीही वेळोवेळी आपल्या न्यायहक्कासाठी महापालिकेसह कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर आंदोलने केली होती. एकूणच कामगार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत होणारे दुर्लक्ष पाहता राज्य शासनाच्या कामगार कार्यालयाने महापालिकेचा कामगार परवानाच रद्द करण्याची कारवाई केली. या कारवाईविरोधी महापालिकेने कामगार उपआयुक्तांकडेच अपील करणे गरजेचे असताना प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अपेक्षेप्रमाणे उच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटाळून लावत कामगार उपआयुक्त कार्यालयाकडेच अपील दाखल करण्याचे आदेश दिले. सदर निकाल लागून आता आठ दिवसांचा कालावधी लोटला असून, कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे महापालिकेने अपील दाखल केलेले नाही. सद्यस्थितीत महापालिकेकडे कामगार परवाना नसताना प्रशासनाने घंटागाडीची पाच वर्षांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. परवाना नसताना अशी कोणतीही निविदा काढणे बेकायदेशीर ठरते. त्या आधारे विद्यमान ठेकेदार न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयानेही अशा प्रकारची निविदा काढणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केल्याने घंटागाडीचा ठेका देण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे.