शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक

By admin | Updated: November 13, 2014 00:33 IST

सराईत गुन्हेगार : तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याचे घरफोडी व दरोडा प्रतिबंधक पथक व गुन्हे शोधपथकाने घरफोडी करीत असताना तीन संशयित आरोपींना तीन लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. यामुळे घरफोडीस आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीनही संशयित सराईत व यादी वरील गुन्हेगार आहेत.इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्या होत होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमागवर यांनी काही कर्मचारी घेऊन स्वत:च घरफोडी व दरोडी प्रतिबंधक पथक तयार केले आणि रात्रीची गस्ती सुरू केली. त्यानुसार पहाटे अडीच वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमानवर व कर्मचारी गस्त घालत. पाथर्डी फाटा परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी आंगण हॉटेल लगत असलेल्या भंगार दुकानाजवळ एक चारचाकी वाहन उभे होते आणि त्याच्याजवळ दोन संशयित इसम उभे होते. तसेच भंगार दुकानाचे शटरही अर्धवट स्थितीत उघडे होते. त्यांना हटकले असता त्यांच्यातील एकजण भंगार दुकानातील भंगार पोत्यात भरत होता. तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले. त्यावेळी तातडीने गुन्हेशोधक पथकास घटनास्थळी बोलाविण्यात आले. यावेळी भगवान रामदास गाढवे (३५), रा. देवळाली गाव, जावेद रज्जाक शेख (२१) रा. द्वारका व उत्तम नामदेव भालेराव (२९) रा. देवळालीगाव या तिघाही सुराईत गुन्हेगाराकडून (एमएच १५ डीसी ९७८६) चारचाकी व १०० किलो भंगार असा सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक जमील शेख व कर्मचारी होते. (वार्ताहर)