शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून तीन संचालक बिनविरोध

By admin | Updated: March 2, 2016 23:22 IST

निवड : कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना संचालक निवडणूक

 सिन्नर : अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार अशोक काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. या १८ संचालकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. सिन्नर पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र भागवतराव घुमरे, सोमठाणे येथील डॉ. सर्जेराव दत्तात्रय कोकाटे व येवला तालुक्यातील मुखेड येथील विश्वासराव लक्ष्मण अहेर या नाशिक जिल्ह्यातील तिघांची या कारखान्यावर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. सिन्नरचे दोन, तर येवला तालुक्यातील एक संचालक या कारखान्यावर नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मंगळवारी माघारीची अंतिम मुदत होती. माघारीच्या दिवशी १८ संचालक बिनविरोध निवडून आले. त्यात नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. पोहेगाव गटातून सिन्नर पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र भागवत घुमरे बिनविरोध निवडून आले. मंजूर गटातून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील डॉ. सर्जेराव दत्तात्रय कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली. घुमरे व कोकाटे या दोघांची सिन्नर तालुक्यातून संचालक म्हणून निवड झाली आहे, तर येवला तालुक्यातील मुखेड येथील विश्वासराव लक्ष्मण अहेर यांची धामोरी गटातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सिन्नर व येवला तालुक्यातील सभासद आहेत. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील १९ गावांचे कार्यक्षेत्र कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या क्षेत्रात येते. दरम्यान, माजी आमदार अशोक काळे यांच्या नेतृत्वाखाली २१ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून, केवळ माहेगाव देशमुख गटात तीन जागांसाठी येत्या ९ तारखेला मतदान होत आहे. माहेगाव गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. काळे गटाकडून अशोक काळे, आशुतोष काळे व सूर्यभान कोळपे उमेदवार असून, त्यांच्याविरोधात अ‍ॅड. दिलीप लासुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंजूर, पोहेगाव, चांदेकसारे, कोपरगाव, धामोरी या गटातील संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. केवळ माहेगाव गटासाठी निवडणूक होत आहे. (वार्ताहर)