नाशिक : कारवरील ताबा सुटल्याने झाडावर कार आदळून अपघात झाल्याची घटना रविवारी (दि़१३) पहाटे पाच वाजेच्या सुमारास गंगापूररोडवर घडली आहे़ या अपघातात महिलेसह तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील माउली लॉन्सजवळील रहिवासी सौरभ चटर्जी (२७), जितेंद्र दोंदे (२०), तेजश्री जाधव (२७) हे तिघे पहाटेच्या सुमारास गंगापूररोडवरून कारने (एमएच १५, सीएस ३६०५) जात होते़ यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने रेड चिली हॉटेलजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार आदळली़ या अपघातामध्ये कारमधील चटर्जी, दोंदे व जाधव हे तिघे जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}