पांडवनगरी रस्त्यावर भाजीविक्रेत्यांनी मांडले ठाण

By Admin | Updated: December 30, 2016 23:56 IST2016-12-30T23:56:20+5:302016-12-30T23:56:38+5:30

तक्रार : सीमा हिरे यांना निवेदन

Thousands of villagers set up on the Pandavangan street | पांडवनगरी रस्त्यावर भाजीविक्रेत्यांनी मांडले ठाण

पांडवनगरी रस्त्यावर भाजीविक्रेत्यांनी मांडले ठाण

इंदिरानगर : वडाळा - पाथर्डी रस्त्याला लागून पांडवनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजीविक्रेते ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्या भाजीविक्रेत्यांना भाजीबाजार बांधून देण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत पांडवनगरी वास्तवात आली. यामध्ये सुमारे पंधराशे सदनिका आहेत. तसेच परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायटी वाढत आहे.
त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोकवस्तीही वाढत आहे. भाजीबाजार गंभीर समस्या बनली आहे. हमरीतुमरीच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी भाजीबाजार  बांधून द्यावा, अशा मागणीच्या निवेदनावर नवदुर्गा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, विश्वनाथ पवार, सुनील गांगुर्डे, संजय राव, अरुण पवार, कैलास शिंदे, विमल गावंडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of villagers set up on the Pandavangan street