शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 29, 2014 22:31 IST

..अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील कारवाडी शिवारात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याला अखेर तिसऱ्या दिवशी अग्निडाग देण्यात आला. तथापि, सदर बिबट्याचे शरीर पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करता आले नाही त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.कारवाडी शिवारातील बाबासाहेब पुंडलीक जाधव यांच्या सोयाबीन पिकाच्या शेतात शनिवारी सायंकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आला होता. रविवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी सुटीमुळे उपलब्ध होऊ न शकल्याने शवविच्छेदनाअभावी बिबट्यावर अंत्यसंस्कार करता आले नव्हते. सोमवारी सकाळी वावी पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. पी. डी. महाजन यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याच्या शरीराची पाहणी केली. यावेळी मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करता येणे शक्य नसल्याचा अहवाल त्यांनी दिला. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे नेमके समजू शकले नाही. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला अग्निडाग दिला.यावेळी नाशिक पश्चिम विभागाचे सहायक उपवनसंरक्षक पी. पी. भांमरे, सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एल. बिन्नर, नांदूरशिंगोटे विभागाचे वनपाल एस. एम. गायकवाड, वनरक्षक पी. एस. सरोदे, बालम शेख, डी. एस. वाघमारे, व्ही. एम. आव्हाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)