सिन्नर (नाशिक) : तालुक्याच्या पूर्व भागातील दुसंगवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची दहा झाडे कापून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सोनवाडी गावालगत रामनाथ बाबुराव ढमाले यांची शेती आहे. त्यांनी पंधरा वर्षापूर्वी सुमारे दीडशे चंदनाची झाडे लावली आहेत. ढमाले शुक्रवारी सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता चंदनाची दहा झाडे अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याची त्यांचे निदर्शनास आले. ढमाले यांनी वावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद देण्याचे काम सुरू केले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}