नाशकात चोरट्यांचा पोलिसांवर दगडफेक करून हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 13:59 IST2020-03-08T13:48:27+5:302020-03-08T13:59:31+5:30
भाभानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारील पाण्याच्या टाकीजवळ दोन चोरट्यांनी गस्तीपथकातील दोन पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक करून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

नाशकात चोरट्यांचा पोलिसांवर दगडफेक करून हल्ला
नाशिक : भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभगृह परिसरात शनिवारी (दि.७) रात्री १ वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी गस्तीपथकातील दोन पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक करून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई मनोज विष्णु गवळी (३१) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाभानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारील पाण्याच्या टाकीजवळ असलेला क्युआर कोट स्कॅन करण्यासाठी कर्तव्यावर असलेले फिर्यादी पोलीस शिपाई मनोज गवळी व निलेश शिंदे यांना संशयित आरोपी भारतनगर येथील वसीम मेहमूद सय्यद (२२) व किरण अशोक खंबाईत वायर गोणीत भरताना दिसले. ही वायर कोठून तरी चोरून आणली असल्याचा संशय गवळी व शिंदे यांना आल्याने त्यांनी संशयितांना हटकले असता दोन्ही संशयितांनी पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केला. त्यामुळे दोन्ही आरोपीतांवर पोलिसांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सी.एम.श्रीवंत या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.