वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

By Admin | Updated: August 21, 2014 00:16 IST2014-08-20T22:33:30+5:302014-08-21T00:16:42+5:30

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

There is a tremendous increase in the honor of older artists | वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

रेडगाव खुर्द : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील अ, ब, आणि क या दर्जातील वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा राज्यातील २३,३७२ लाभार्थींना लाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे वृद्ध कलावंतांनी स्वागत केले आहे.
कीर्तन, भजन, गायन, भारूड, नाटक, गोंधळ गीते आदि कला व साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आपली हयात घालविणाऱ्या नागरिकांचा वृद्धापकाळ सुखकर जावा म्हणून शासन त्यांना त्यांच्या मान्यतेनुसार मानधन देते. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात औषधोपचार, प्रवास व दैनंदिन गरजा भागविताना त्यांनाही त्याची झळ बसत असून, मिळणारी मानधनाची रक्कम अत्यल्प ठरते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच राष्ट्रीय, राज्य व स्थानिक असे अनुक्र मे अ, ब, क
दर्जाच्या सर्व वृद्ध कलावंतांच्या
मानधनात दीडपटीने वाढ केली आहे. सदरचा निर्णय १५ आॅगस्टपासून लागू झाला आहे.
याचा लाभ राज्यातील २३,३७२ वृद्ध कलावंत व साहित्यिकांना होणार
आहे.
यात चांदवड तालुक्यात २२ लाभार्थी असून, २४ प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे गेल्या अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. (वार्ताहर)

Web Title: There is a tremendous increase in the honor of older artists