शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ दुर्गावताराने चोरट्यांचे पलायन

By admin | Updated: October 25, 2016 23:57 IST

उपनगर येथील घटना : महिलांच्या साहसाने वाचले इसमाचे प्राण

उपनगर : येथील महाराष्ट्र बॅँकेसमोरील कॅनॉलरोडवर सोमवारी रात्री एका दुचाकीधारकाला अडवून त्यास मारहाण करीत पैशांची बॅग पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला दोघा महिलांनी कडाडून विरोध केल्याने त्या चोरट्यांना घटनास्थळावरून पलायन करावे लागले.नाशिक येथील के. आर. ट्रेडर्सचा कोंबडी विक्रीचा व्यवसाय असून, तेथील कर्मचारी अरुणकुमार हे सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास द्वारकेकडून उपनगर कॅनॉलरोडमार्गे जेलरोडला जात होते. ठिकठिकाणच्या दुकानदारांकडून वसुली करून २२ हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन अरुणकुमार अ‍ॅक्टिवा गाडीवर जात असताना गांधीनगर येथे दोन पल्सर दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याने त्यांना हुलकावणी देऊन पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत अरुणकुमार यांनी दुचाकी जोरात चालवत उपनगर महाराष्ट्र बॅँकेसमोरील कॅनॉलरोड मार्गाने निघाले.कॅनॉलरोड झोपडपट्टीजवळ पुन्हा त्या दोन दुचाकीवरील पाच जणांच्या टोळीने अरुणकुमार यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यातील तिघा जणांनी हातातील लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील पैशांची बॅग व मोबाइल हिसकविण्याचा प्रयत्न केला. अरुणकुमार यांनी आरडाओरड केल्याने झोपडपट्टीजवळच उभ्या असलेल्या राधिका दाहिजे व सुनीता पगारे या दोन महिला घटनास्थळी धावून आल्या. त्यांनी त्या चोरट्यांना मारहाणीचे कारण विचारत चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यातील एकाने राधिका दाहिजे या महिलेस लोखंडी रॉड फेकून मारला. त्यामुळे संतप्त झालेल्या या दोन्ही महिलांनी तिघा युवकांना जोरदार प्रतिकार करत खाली पाडले. तोपर्यंत आजूबाजूचे नागरिक व महिला मदतीला धावत येत असल्याचे पाहून तिघा चोरट्यांनी कशीबशी महिलांच्या तावडीतून आपली  सुटका करत इतर दोघा  चोरट्याच्या दुचाकीवरूनच धूम ठोकली.  राधिका दाहिजे व सुनीता पगारे या दोन्ही महिलांनी दाखविलेल्या धाडसामुळे चोरी करणाऱ्या त्या टोळीला पळून जाण्यास भाग पडले. सदर घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. (वार्ताहर)