भुजबळ यांच्या दौऱ्यात चोरट्यांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:29 IST2018-06-16T00:29:10+5:302018-06-16T00:29:10+5:30
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवल्याच्या दौºयावर असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांच्या खिशावर डल्ला मारला. मात्र सदरचा प्रकार लक्षात येताच एका संशयिताला अटक केली

भुजबळ यांच्या दौऱ्यात चोरट्यांची चांदी
लासलगाव : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवल्याच्या दौºयावर असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांच्या खिशावर डल्ला मारला. मात्र सदरचा प्रकार लक्षात येताच एका संशयिताला अटक केली असून त्याचे योगेश सुखदेव जाधव रा. गांधीनगर( बीड ) असे त्याचे नाव आहे. येवला लासलगांव मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ हे शुक्रवारी नाशिक येथून मोटारीने येवला येथे जात होते.विंचूर व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भुजबळांच्या स्वागतासाठी उभे होते. याच गर्दीचा फायदा घेत पुंजाराम खाडे रा. विंचूर यांच्या खिशात चोरटा हात घालत असताना खाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करत पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांच्या खीशावर डल्ला मारत संधी साधली. यात धोंडीराम धाकराव, रंगनाथ गायकर, प्रमोद राऊत, विलास गोरे, संजय साळी यांना फटका बसला.