गणपती मंदिरात चोरी

By Admin | Updated: September 10, 2016 01:10 IST2016-09-10T01:10:43+5:302016-09-10T01:10:55+5:30

गणपती मंदिरात चोरी

Theft in Ganpati temple | गणपती मंदिरात चोरी

गणपती मंदिरात चोरी

 नाशिक : विसेमळ्यातील गणेशमंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़ ४) रात्रीच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विसे चौकातील ओम साई इच्छामणी गणपती मंदिराच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश केला़ तसेच मंदिरातील मूर्तीसमोर ठेवलेली पितळी समई, अ‍ॅम्प्लिफायर आणि रोख रक्कम असा सुमारे ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी विनय सदाशिव सानप (रा. ध्रुपद सोसायटी, विसेमळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Theft in Ganpati temple