मुंबई-नाशिक महामार्गावर "द बर्निंग ट्रक", सुदैवाने जखमी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 21:07 IST2022-05-21T21:06:21+5:302022-05-21T21:07:25+5:30
Burning Truck : दोन दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत पेंढरघोळ फाट्या लगतच्या रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली.

मुंबई-नाशिक महामार्गावर "द बर्निंग ट्रक", सुदैवाने जखमी नाही
शाम धुमाळ
कसारा : मुंबई - नाशिक महामार्गांवरील पेंढरघोळ फाट्या लगत असलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला एका भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली याबाबत अग्निशमन दलाचे जवान माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले.
दोन दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत पेंढरघोळ फाट्या लगतच्या रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. ट्रकच्या केबिनमधून आग येत असल्याने हवेमुळे आग झपाट्याने वाढत होती. अचानक आगीचा भडका उडाल्याने ट्रकच्या पुढील टायरने पेट घेतला त्यात टायरचा स्फोट होऊन आगीचा भडका जादा प्रमाणात उडाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शहापूर केंद्रचे कर्मचारी,आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य व जें.एस. डब्लू उद्योग समूह वासिंद यांची अग्निशमक गाडी घटनस्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरु केले. या घटनेमुळे मुंबईहूननाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.