शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात संततधारेमुळे त्रिंगलवाडी, तळोशी बंधारे फुल्ल

By admin | Updated: July 28, 2014 00:42 IST

वाकी खापरी धरण : प्रथमच पाणी साठल्याने अनेक गावांना वेढा

घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील त्रिंगलवाडी आणि तळोशी ही लहान साठवण क्षमतेची बंधारे पूर्ण भरून वाहू लागली असून, दारणा आणि भावली धरणक्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे ही धरणे ४५ टक्के भरली आहेत. पावसाचे प्रमाण अजून पंधरा दिवस असेच कायम राहिल्यास ही दोन्ही धरणे पूर्णपणे भरतील असा विश्वास पाटबंधारे विभागाचे अधिकारी एस. के. मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान तालुक्यातील वाकी खापरी या नवीन धरणात या वर्षापासून पाणी साठविण्यात आले असून, या धरणात दहा टक्के पाणी साठा झाल्याने धरणाच्या फुगवट्याने परिसरातील अनेक गावांना वेढा दिला आहे.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यालाही पावसाची दीड महिना प्रतीक्षा करावी लागली होती.त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उसंत न घेतल्याने नदी, नाले, बंधारे आणि धरणे यांच्या साठवणक्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक बंधारे पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून, यातील त्रिंगलवाडी आणि तळोशी ही बंधारे काठोकाठ भरून वाहू लागली, तर तालुक्यासह मराठवाड्याच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची मदार असलेली दारणा आणि भावली धरणातही सुमारे चांगला पाणीसाठा झाला असल्याने तालुक्यातील जनता सुखावली आहे.पंधरा दिवसांपासून होणाऱ्या संततधारेमुळे खरिपाच्या विशेषत: भाताच्या लागवडीला वेग आल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळते.दरम्यान, कडवा धरणक्षेत्र आणि पूर्व भागात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने या भागातील एकमेव कडवा धरणातील साठा सर्वांत कमी आहे. (वार्ताहर)