शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नाशिककर धन्यवाद : मतदानानंतर मतमोजणीही शांततेत; पोलीस प्रशासनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:59 PM

गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तैनात केले होते.

ठळक मुद्देनिवडणुकीची मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

नाशिक : शहरासह जिल्ह्यात मतदानप्रक्रियेसह मतमोजणीही गुरुवारी (दि.२३) शांततेत पार पडली. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस मुख्यालयस्तरावर सुक्ष्म नियोजन करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कायदासुव्यवस्था अबाधित राहिली. नाशिककर जनतेने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले आहे. शहरासह जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या जवानांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या व अतिरिक्त पोलिसांचा फौजफ ाटा पहारा देत होता.शहर व ग्रामीण भागात २९ एप्रिलरोजी लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी तीन हजारांपेक्षा अधिक पोलीसांचे बळ तैनात करण्यात आले होते. गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तैनात केले होते. वैयक्तिकरीत्या बंदोबस्ताची आखणी करून त्यानुसार उपआयुक्त, उपअधीक्षक, सहायक आयुक्त सहायक उपअधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशाील भागात तसेच राजकीय पक्षांचे कार्यालये, निवासस्थाने, मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. २९ एप्रिलपासून अंबड येथील मतमोजणी केंद्रात जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रे निमलष्करी जवानांच्या सुरक्षेखाली बंदिस्त ठेवण्यात आली होती. या केंद्राला सशस्त्र निमलष्करी जवानांचा वेढा होता. गुरुवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होऊन रात्री उशिरापर्यंत शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. रात्री उशिरा बारा वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.संवेदनशील भागावर विशेष नजर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना ‘अ‍ॅलर्ट’देत नांगरे-पाटील यांनी सराईत गुन्हेगारांची धरपकड करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरात सर्वत्र चोख बंदोबस्तात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तसेच शहरातील पंचवटी, भद्रकाली, अंबड, सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर यांसारख्या पोलीस ठाणेहद्दीतील संवेदनशाील भागावर पोलिसांची विशेष नजर होती. रात्रीची गस्त वाढवून परिसरात कायदासुव्यवस्था धोक्यात आणू पाहणा-या संभाव्य संशयितांची धरपकड करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVotingमतदान