शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांची ‘मौनी’ भूमिका बनकरांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:53 IST

नाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.

ठळक मुद्देशेतकरीहित वाऱ्यावर : जनआंदोलनाच्या वेळी कुठे गेले होते, असा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.विधानसभा निवडणुकीत आजी- माजी आमदारांनी जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा विचार करून मतदार गेल्या काही वर्षांतील हिशेब मतदानातून चुकता करतात. त्यामुळे यंदा निफाड विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून दिलीप बनकरांनी गेल्या दहा वर्षांत जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या सोईस्कर भूमिकांना उजाळा देण्यात येत आहे. मतदारसंघातील गावोगावच्या प्रश्नांवर बनकर यांनी साधलेल्या सोईस्कर मौनाचीदेखील चर्चा होऊ लागली आहे.विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात बनकर पूर्णत: अपयशी ठरले असून, ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व ते करू इच्छितात त्या शेतकºयांच्या प्रश्नावरदेखील त्यांची भूमिका सोयीची ठरली आहे. कांदा व द्राक्ष उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाºया निफाड तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडण्याचा निर्णय अनेकवार सत्ताधाºयांनी घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी अन्य स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्यांनी आंदोलने केली; पण त्याकडे डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच पक्षातर्फे मतदारसंघातील लासलगाव, विंचूरलाच काय पिंपळगावनजीक, चांदवडला केल्या गेलेल्या आंदोलनांकडेही बनकर फिरकले नव्हते, असे पक्षाचे कार्यकर्तेच बोलून दाखवित आहेत. त्यामुळे निवडणूक आल्यावरच दारात येणाºयाला कसे पाठबळ द्यायचे, असा त्यांचा प्रश्न आहे.कांद्याच्या निर्यातबंदीचा विषय असो वा कांदा साठवणूक, या दोन्ही प्रश्नांनी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी त्रस्त असताना बनकर यांनी बाजार समितीचे सभापती म्हणून सरकारच्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.सरकारला सदरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी शेतकरी उत्सुक असताना बनकर यांनी बाजार समित्या बंद करण्याचा निव्वळ इशारा देऊन आपली तलवार म्यान केली. त्यामुळे अशा ‘मौनी’भूमिका घेणाºयांना निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्न आता मतदारच विचारताना दिसत आहेत.रस्त्याची अक्षरश: चाळणीनाशिक-औरंगाबाद या राष्टÑीय महामार्गावर नैताळे ते पिंपळस रामाचेदरम्यान गेल्या काही वर्षांत प्रचंड खड्डे पडून अपघातांची मालिका सुरू झाली असताना एकदाही बनकर यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून ना जनआंदोलन छेडले ना सरकारला जाब विचारण्याची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत ते निफाड या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. खुद्द बनकर यांनी या रस्त्याचा अनेकवेळा अनुभव घेतला असताना त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य का कळू शकले नाही, असा प्रश्न या परिसरातील मतदार विचारू लागले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nifadनिफाड