साधुग्रामसाठी तात्पुरते अधिग्रहण

By Admin | Updated: September 19, 2014 00:45 IST2014-09-17T23:17:48+5:302014-09-19T00:45:13+5:30

श्रीकांत सिंह : कुंभमेळ्यासाठी आढावा बैठक

Temporary acquisition for Sadhugram | साधुग्रामसाठी तात्पुरते अधिग्रहण

साधुग्रामसाठी तात्पुरते अधिग्रहण

नाशिक : कुंभमेळ्यासाठी तपोवनातील साधुग्रामला लागणाऱ्या जागेचे तात्पुरते अधिग्रहण करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विभागांच्या कामाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्रीकांत सिंह म्हणाले की, पूर्वीच्या नियोजनानुसार व ठरलेल्या आराखड्यानुसारच कुंभमेळ्याची कामे केली जातील. तपोवनातील साधुग्रामला लागणाऱ्या जागेचे तात्पुरते अधिग्रहण करण्यात येणार असून, तशा सूचनादेखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याची आराखड्यानुसार कामे यापूर्वीच मंजूर झाली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. नियोजनानुसार सर्व विभागांची कामे ठरलेल्या टप्प्यानुसार सुरू असून, कामाबाबत समाधानी असल्याचे सिंह यांनी सांगितले.
यावेळी विविध विभागांनी आपल्या कामांचा अहवाल सादर केला. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, प्रभारी मनपा आयुक्त सोनाली पोंक्षे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Temporary acquisition for Sadhugram