शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा पोलिसांची कस्टडी : नाशिकच्या सराफाचा शासकिय इमारतीवरून कोसळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 22:32 IST

नाशिक : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या ...

ठळक मुद्देशासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून कोसळून मृत्यूसायबराबाद आयुक्तालयच्या कर्मचाऱ्यांचे विशेष पथक शहरात मुक्कामीकारवाई संशयाच्या भोव-यात सापडली

नाशिक :तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता नाशिकला आले. दरम्यान, या पथकाने घरफोडीतील मुख्य संशयिताने दिलेल्या कबुलीवरून पंचवटीतील संशयित सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी (४५) यांना चौकशीसाठी सोमवारी (दि.२४) ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.२५)पथकाच्या ताब्यात असताना बिरारी यांचा शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला. यामुळे शहरात खळबळ उडाली. सायबराबाद पोलिसांच्या या कारवाईबाबत कुठल्याहीप्रकारची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती. त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोव-यात सापडली आहे. मयत बिरारी यांच्या नातेवाइकांनी सायबराबाद पोलिसांच्या तपासी पथकावर घातपाताचा आरोप जाहीररीत्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी बोलताना केला.सायबराबाद आयुक्तालय हद्दीत लुटलेल्या मुद्देमालाच्या चौकशीसाठी गुन्हे शोध पथकाचे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली सुमारे आठ ते दहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक आरोपी प्रकाश उर्फ नाग्या शिंदे (रा. निलगिरीबाग, औरंगाबादरोड) यास घेऊन दोन दिवसांपासून शहरात मुक्कामी आले आहेत. या गुन्ह्यात पथकाने संशयावरून चौकशीसाठी (बेस्ड कस्टडी) बिरारी व त्यांच्या दुकानातील एका कारागिराला ताब्यात घेतले होते. घरफोड्यांमध्ये लुटलेले दागिने सराफाला विक्री केल्याची कबुली प्रकाशने तपासी पथकाला दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावरून त्या पथकाने बिरारी यांना अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असताना अचानकपणे बिरारी हे विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून कोसळून ठार झाल्याची घटना घडली. सायबराबाद पोलिसांच्या ताब्यातून निसटून बिरारी यांनी आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. याप्रकरणाचा सविस्तर तपास सीआयडीकडून केला जाणार असल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTelanganaतेलंगणाPoliceपोलिसDeathमृत्यूhyderabad caseहैदराबाद प्रकरण