शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

शिक्षक बदल्यांतील तांत्रिक दोेष दूर व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 8:02 PM

गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाइन बदल्या केल्या जात असून, त्यासाठी करण्यात आलेल्या नियमांमध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्याची भावना यावेळी व्यक्त केली.

ठळक मुद्देसमितीकडून आढावा : आॅनलाइन बदल्यांबाबत संमिश्र मते

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा तसेच आॅनलाइन बदल्यांबाबत प्रशासन, पदाधिकारी व शिक्षक संघटनांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या राज्यस्तरीय अभ्यासगटासमोर गुरुवारी संमिश्र मते व्यक्त करण्यात आली. आॅनलाइन बदल्यांमुळे गैरप्रकार टाळण्यास मदत झाली असली तरी, त्यातील तांत्रिक दोष दूर करून काही अधिकारी स्थानिक पातळीवर ठेवण्यात यावे, असा सूरही व्यक्त करण्यात आला.

नाशिक विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिक्षण सभापती, शिक्षक आमदार, शिक्षणाधिकारी तसेच शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची दोन सत्रात बैठक शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आली. या बैठकीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद, राहुल कर्डिले, डॉ. संजय कोलते, विभागीय उपायुक्त प्रतिभा संगमनेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अभ्यास गटाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन व आंतरजिल्हा बदल्यांबाबत शासनाच्या सध्याच्या धोरणात येत असलेल्या अडचणींबाबत माहिती जाणून घेतली. गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाइन बदल्या केल्या जात असून, त्यासाठी करण्यात आलेल्या नियमांमध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्याची भावना यावेळी व्यक्त केली. आॅनलाइन बदल्या करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्याचबरोबर दोन, तीन राउंड नंतरही शिक्षकांना नेमणुका न मिळून त्यांना विस्थापित म्हणून गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. महिला शिक्षिका, अवघड क्षेत्र व दुर्गम भागात शिक्षकांची नेमणूक करताना आॅनलाइन सॉफ्टवेअरमध्ये काही बदल आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. सातत्याने आदिवासी क्षेत्रातच शिक्षकांना नेमणुका देण्यात येऊ नयेत, त्याचबरोबर बदल्यांमध्ये अन्याय झाल्याचे स्पष्ट झाल्यास अशा बदल्या दुरुस्त करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद प्रशासनाला असावेत, अशी मागणीही करण्यात आली तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही यात सहभागी करून घेण्याची शिफारसही करण्यात आली. या बैठकीस सकाळच्या सत्रात विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांनी न्यायालयातील प्रकरणांतील निर्देश, बदल्यांच्या प्रचलित शासन निर्णयातील प्रस्तावित बदलाबाबत सादरीकरण केले. तर दुपारच्या सत्रात शिक्षक संघटनांनी आपले म्हणणे मांडले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद