शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्याचा वेध घेत शिक्षकांनी विद्यार्थी घडवावे

By admin | Updated: February 26, 2017 23:06 IST

नाशिक : जागतिकीकरणाच्या युगात प्रचंड स्पर्धा वाढली असताना भारतातील शिक्षणप्रणाली अद्याप बदललेली नाही. असे प्रतिपादन राष्ट्रीय इन्डिपेंडन्ट लेबर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केले.

नाशिक : जागतिकीकरणाच्या युगात प्रचंड स्पर्धा वाढली असताना भारतातील शिक्षणप्रणाली अद्याप बदललेली नाही. नावीन्यतेचा, चिकित्सक दृष्टिकोनचा अभाव यांसह विविध समस्यांनी शिक्षणव्यवस्था ग्रासली आहे. त्यासाठी शिक्षकांनी व्यापक चळवळ उभारून भविष्याचा वेध घेत विद्यार्थी घडविले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय इन्डिपेंडन्ट लेबर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केले.  मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे इन्डिपेंडन्ट सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी टीचर्स युनियनच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रा. गंगाधर अहिरे, अ‍ॅड. अंकिता मुदलियार, संघटनेचे अध्यक्ष रोहित गांगुर्डे, सरचिटणीस किशोर शिंदे, कार्याध्यक्ष संजय साळवे, सूर्यभान जगताप उपस्थित होते. पाटील म्हणाले, विकसनशील भारतासमोर दर्जेदार, कौशल्याधिष्ठित विद्यार्थी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. मात्र त्या शिक्षकांपुढेदेखील विविध समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, शिक्षक भरतीला लागलेला ब्रेक, संस्थाचालकांची मनमानी यांसह विविध प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनल्याने शिक्षकांनाही ज्ञानदानाचे कार्य करणे कठीण झाले असल्याचे पाटील म्हणाले.  डॉ. चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करताना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम निष्ठेने करीत राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागात शिक्षणाची दुरवस्था असून, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी नागरिक घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असेही डॉ. चंदनशिवे म्हणाले. यावेळी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रोहित गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकइन्डिपेंडन्ट सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी टीचर्सच्या वर्धापनदिनी शिक्षकांना गौरविण्यात आले. यात प्रा. भारत शिरसाठ, डॉ. मिलिंद बागुल, अशोक निकम, मिलिंद यादव, किसन चव्हाण, रोहिणी शिंदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  विशेष संघटन पुरस्कार नानासाहेब पटाईत यांना प्रदान करण्यात आला. तर अनिल माळी, भारती भोये, अशोक दाणी, गंगाधर खुरकुटे, मिलिंद शिरसाठ, रमेश पवार, शांताराम गांगुर्डे, शिवाजी माळी, गणेश अहिरे, दिगंबर नारायणे, कल्पना जगताप, के. के. गांगुर्डे, अन्सारी शिफक अहमद अजीज शेख, वंदना भोये या शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.