आदर्श शिक्षक पुरस्कारांनी शिक्षकवृंदांचा गौरव

By Admin | Updated: September 6, 2016 23:02 IST2016-09-06T23:02:17+5:302016-09-06T23:02:37+5:30

शिक्षकदिन : अनेक संस्थांकडून शिक्षकांचा गौरव, शाळांमध्येही विविध कार्यक्रम

Teacher's Graduation Award by Adarsh ​​Teacher Award | आदर्श शिक्षक पुरस्कारांनी शिक्षकवृंदांचा गौरव

आदर्श शिक्षक पुरस्कारांनी शिक्षकवृंदांचा गौरव

वाघ गुरुजी शाळा
नाशिक : वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक वनीता पाटील, रंजना घुले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापक पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी निंबाळकर यांनी केले.
सेंट फ्रान्सिस
नाशिक : सेंट फ्रान्सिस शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालायात शिक्षकदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी यावेळी स्वरचित कविता सादर केल्या. शिक्षक दिनानिमित्ताने शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्राथमिक विभागातील सोनाली परमार, अर्चना माळी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेचा सर्वोच्च पुरस्कार परमार यांना जाहीर करण्यात आला. तसेच इतर शिक्षकांनाही गौरविण्यात आले.
नवरचना विद्यालय
नाशिक : नवरचना विद्यालय प्राथमिक विभागात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संदीप शेटे आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी यांनी केले.
याप्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवरजना विभाग पालक शिक्षक संघाच्या वतीनेही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून २५ वह्या, पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती चौधरी यांनी केले. आभार निशा हिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा वायकंडे, माया आचार्य, निशा बर्वे, अनिता अहिरे, संजय अहिरे, हेमराज साबळे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Teacher's Graduation Award by Adarsh ​​Teacher Award