शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

तात्या टोपे स्मारक अखेर बाभूळगावीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 17:21 IST

प्रशासकीय मान्यता : जागेवरुन वाद पेटण्याची शक्यता

ठळक मुद्देतात्या टोपे यांच्या स्मारकासाठी येवला नगरपरिषदेने शहर पाणीपुरवठा साठवण तलावालगतची जागा स्माराकासाठी निश्चित करून तसा ठरावही केला आहे. 

येवला : येवल्याचे भूमिपुत्र आणि १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या १० कोटी ९२ लक्ष रुपयांच्या निधीसह आराखड्यास राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने स्मारकाच्या कामाला चालना मिळणार आहे. मात्र, सदर स्मारक हे नगरपरिषदेच्या हद्दीतील बाभूळगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर ४९ व ५० च्या जागेवरच बांधण्याचा स्पष्ट उल्लेख शासननिर्णयात असल्याने जागेवरुन वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीने स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या २०० व्या स्मृतीनिमित्त येवला येथे स्मारक बांधण्यासाठी त्यांचा ७५ टक्के म्हणजे ७ कोटी ८८ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. या स्मारकाच्या बांधकामासाठी राज्य शासनाचा १५ टक्के म्हणजे १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये हिस्सा असणार असून उर्वरित १० टक्के खर्च म्हणजे १ कोटी ४६ लाख ७९ हजार रुपये येवला नगरपरिषदेला करावा लागणार आहे. शासनाने सदर १० कोटी ९२ लाख २९ हजार रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास काही अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता दिली असून तसा आदेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने सोमवारी (दि.१९) निर्गमित केला आहे. शासनाने आदेश काढताना मात्र, सदर स्मारक हे येवला नगरपरिषदच्या हद्दीतील बाभूळगाव खुर्द शिवारातील सर्व्हे नंबर ४९ आणि ५० याठिकाणी बांधण्यास मान्यता दिलेली आहे. शासनाने गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या स्मारकाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रत्यक्ष कामास चालना मिळणार असली तरी जागेवरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी येवला नगरपरिषदेने शहर पाणीपुरवठा साठवण तलावालगतची जागा स्माराकासाठी निश्चित करून तसा ठरावही केला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक