शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार हत्त्येप्रकरणी संशयितास अटक

By admin | Updated: July 28, 2014 00:42 IST

सराईत गुन्हेगार हत्त्येप्रकरणी संशयितास अटक

पंचवटी : पूर्ववैमनस्यातून फुलेनगर येथे राहणारा सराईत गुन्हेगार सोनू भरसागर याच्या हत्त्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अक्षय छाबरिया या संशयिताला अटक केली आहे, तर त्याचा दुसरा साथीदार पसार झाला आहे. शनिवारी रात्री सोनू नभी भरसागर याची विशाल भालेराव व अक्षय छाबरिया या दोघांनी जुन्या वादातून फुलेनगर पाटाजवळ हत्त्या केली. त्यानंतर दोघेही संशयित फरार झाले होते. रविवारी छाबरिया हा त्याच्या उपनगर येथील घराजवळ असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेतील मयत भरसागर याच्या हत्त्येप्रकरणी मयताची पत्नी वंदना भरसागर हिने पंचवटी पोलिसांत विशाल भालेराव व त्याचा मित्र अक्षय अशा दोघांनी पती भरसागर याला रात्री घरातून बोलावून नेऊन जुन्या वादातून कुरापत काढून शिवीगाळ करून धारदार शस्त्राने पोटावर वार करून हत्त्या केल्याची तक्रार नोंदविली होती. पंधरवड्यापूर्वी मयत व त्याच्या दोघा मित्रांना परिसरातीलच काही संशयितांनी मोबाइल चोरी केल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात पोलिसांनी छाबरिया याला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार फरार झाला आहे. भरसागर याची हत्त्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचे स्पष्ट झाले असून, आणखी काही संशयितांचा यात सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस त्यादृष्टीने शोध घेत आहेत.दरम्यान, या हत्त्या प्रकरणात फरार असलेला भालेराव हादेखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. (वार्ताहर)